March 12, 2017

‘२०१८’ च्या ईदचे सलमानने केले बुकींग

Written by

salman-khan

salman-khan
२०१५ मध्ये ‘एक था टायगर’ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर याचा सिक्वेल बनवण्याची तयारी सुरू झाली असून २०१७च्या ईदच्यावेळी हा सिक्वेल ‘टायगर जिंदा है’ या नावाने प्रदर्शित होईल. यात सलमानची पूर्व प्रेयसी कतरिना कैफ नायिकेच्या भूमिकेत झळकण्याची दाट शक्यता आहे.

आपल्या ट्विटरवरुन सिक्वेल बनवणार असल्याची घोषणा ‘एक था टायगर’चे दिग्दर्शक कबीर खानने केली होती. सिक्वेल बद्दल कोणतीही अफवा येण्याअगोदर याची निश्चिती झाली आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट कबीर खान नाही तर अली अब्बास जफर दिग्दर्शित करणार आहे.

यात कॅटरिना कैफला संधी देण्याचा विचार सुरू आहे. अली अब्बास जफर हे कतरिनाचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे यशराज फिल्मसच्या या चित्रपटात कतरिनाची वर्णी लागेल हे निश्चित समजले जाते. दरम्यान सलमानने आगामी ‘ट्युबलाईट’ चित्रपटाचे लदाखमधील शूटींग संपवले आहे. कतरिना सध्या अमेरिकेच्या सहलीवर आहे. तिचा ‘बार बार देखो’ सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

The post ‘२०१८’ च्या ईदचे सलमानने केले बुकींग appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *