March 12, 2017

‘हिंदू मुस्लीम भाई-भाई’ होऊच शकत नाही

Written by

vhp

vhp
मऊ – विश्व हिंदू परिषदेचे अमरीश यांनी ‘हिंदू मुस्लीम भाई-भाई’, असे म्हणून कोणी भाऊ होत नाही. कायदा बनवून कोणी भाऊ होत नाही. तर वंदे मातरम म्हटल्यावरच भाऊ होऊ शकता, असे वादग्रस्त विधान केले आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिवसानिमित्त मऊ येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून आपण ‘मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा’, हे गीत म्हणत आलो आहोत. मात्र यातील सूरच मिळत नसल्याचे अमरीश म्हणाले. तसेच गाईची हत्या करणारे, राम जन्मभूमीवर बाबरी नावाने स्मारक बनविणारे, सन १९९० मध्ये कश्मीर खोऱ्यांतून हिंदूना बाहेर काढणारे, जिहादच्या नावावर बॉम्ब फोडणारे, हिंदू मुलींचे अपहरण करणारे, वंदे मातरम् न म्हणणारे आणि भारत माता की जय यावर आक्षेप घेणाऱ्यांनी कितीही घोषणा केल्या तरी ते आपले बंधू होऊ शकत नाहीत. त्यांच्या या विधानांमुळे सर्व स्तरात खळबळ उडाली आहे.

The post ‘हिंदू मुस्लीम भाई-भाई’ होऊच शकत नाही appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *