March 12, 2017

स्टोरी ऐकताच ‘बँजो’चा दिवाना झाला रितेश !

Written by

ritesh-deshmukh

ritesh-deshmukh
जेव्हा ‘बँजो’ चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा अभिनेता आणि निर्माता रितेश देशमुख कथेच्या प्रेमात पडला होता. जेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट मला ऐकवली तेव्हाच कथेच्या आणि व्यक्तीरेखांच्या प्रेमात पडलो होतो, असे रितेश म्हणाला आहे . चित्रपटाचे स्क्रिप्ट दिग्दर्शक रवी जाधवने रितेशला ऐकवले होते.

मी आणि रवी जाधव चांगले मित्र आहोत. त्यामुळेच ..तू पहिल्यांदा कथा ऐक, त्यातील व्यक्तीरेखा आवडल्या तरच तुझा इंटरेस्ट आम्हाला दाखव असे रवी म्हणाला होता. ‘बालक पालक’ चित्रपटानंतर आम्हाला एकत्र काम करायचे होते. त्यानंतर बँजोची स्क्रिप्ट आमच्याकडे आली. मी या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला अभिमान वाटतो, असे ‘बाप्पा’ या गाण्याच्या लाँचिंगप्रसंगी रितेश म्हणाला.

रितेश रस्त्यावर बँजो वाजवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करीत आहे. हे गाणे विशाल शेखर यांनी संगीतबध्द केले आहे. ‘बँजो’ हे एका संगीत वादनाचे साधन आहे. जर चांगले संगीत असेल तरच चित्रपट चालेल. विशाल शेखर यांनी खूप चांगले काम केले आहे. त्यांचे संगीत चित्रपटाचा कणा आहे, असे रितेश म्हणाला. ‘बाप्पा’ या गाण्यात मुंबय्या स्टाईल आहे, हे एक प्रकारचे रस्त्यावरचे संगीत आहे. गाण्यात भारतीय संगीताचे प्यूजन आहे. लोकांना हे आवडेल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचेही रितेश म्हणाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘नटरंग’, ‘बालक बालक’, ‘टाईमपास’ यासारखे हिट मराठी चित्रपट बनवले आहेत.बँजो चित्रपटातून रवी जाधव बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. ‘बँजो’ १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

The post स्टोरी ऐकताच ‘बँजो’चा दिवाना झाला रितेश ! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *