March 12, 2017

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा पुतळा

Written by

babasaheb-ambedkar

babasaheb-ambedkar
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखालील एकसदस्यीय समितीने मुंबईतील इंदू मिलच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवला.

बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फूट उंच पुतळा या स्मारकामध्ये उभारण्यात येणार आहे. तसेच आर्ट गॅलरीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कलाकृतीही मांडल्या जाणार आहेत. बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची यापूर्वीच्या आराखड्यात ८० फूट ऐवढी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र नव्या आराखड्यात ही उंची ३५० फूट इतकी वाढवण्यात आल्यामुळे हा पुतळा अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच असेल. बाबासाहेबांचे हे स्मारक संसदेच्या प्रतिकृतीप्रमाणेच दिसेल. तसेच या स्मारकाला सांचीसारखे स्तूपही असतील.

The post स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा पुतळा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *