March 12, 2017

सौदीतून भारतीय कामगारांनी लवकर मायदेशी परतावे – सुषमा स्वराज

Written by

sushma-swaraj

sushma-swaraj
नवी दिल्ली – सौदी अरेबियातील आर्थिक अस्थिरतेमुळे काम गमावलेल्या भारतीय कामगारांना मायदेशात लवकरात लवकर परतण्याचे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केले. तसेच त्यांच्या थकीत रकमांचे दावे या कामगारांनी त्यांच्या मालकांकडे दाखल करावेत आणि मायदेशात परतावे म्हणजे भारत सरकार त्यांच्या परतण्याचा खर्च त्यांना देईल.

यावर बोलताना त्या म्हणाल्या की, बंद पडलेल्या कंपन्यासोबत सौदी सरकार चर्चा करुन तुम्ही दाखल केलेल्या दावे निपटारा करेल. त्यानंतर तुमच्या सर्व थकीत रकमा मिळतील. परंतु या सर्व प्रक्रियेला खुपच वेळ जाणार असल्याने सौदी अरेबियातील भारतीय कामगारांनी आपल्या थकीत रकमांचे दावे दाखल करुन भारतात परतावे. त्यांच्या भारतात परतण्याचा सर्व खर्च भारत सरकार करेल. तसेच सौदी सरकार तुमच्या भारतात परतण्यासाठी खास व्यवस्था करत आहे.

The post सौदीतून भारतीय कामगारांनी लवकर मायदेशी परतावे – सुषमा स्वराज appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *