March 12, 2017

सैराट वेडा प्रेक्षक; तब्बल १०५ वेळा पहिला चित्रपट

Written by

sairat

sairat
जातीतल्याच मुलीशी आपल्या आयुष्यात प्रेमभंग झाल्यानंतर विवाह केलेल्या हनुमंत लोंढेने सैराट पाहिला. मुळचा सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या हनुमंतला सैराट आवडला. दुसऱ्या जातीतल्या मुलीशी लग्न न झाल्यामुळे आयुष्यात नाराज झालेल्या या हनुमंतला परशा आणि आर्ची आवडायला लागले आणि मग त्याची सैराट वारी सुरू झाली.

सैराट त्याला इतका आवडला की जोपर्यंत सैराट चित्रपट थिएटरमध्ये आहे, तोपर्यंत पाहायचा असे त्याने मनाशी ठरवूनच टाकले. लाँड्रीमध्ये काम करणारा हनुमंत रोज ३०० रुपये कमवतो. यातील १०० रुपये तो रोज सैराटसाठी वेगळे काढतो. आजपर्यंत या पठ्ठ्याने १०५ वेळा सैराट पाहिला आहे. हा गडी रोज संध्याकाळच्या शोला येतो हे लक्ष्मी थियटरच्या व्यवस्थापकांच्या लक्षात आले. त्याला याबाबत विचारले असता त्याने आजवर सैराट पाहिलेली १०५ तिकीटे दाखवली. त्याचा हा उत्साह पाहून थियएटरच्या व्यवस्थापकांनी त्याला चित्रपट पाहण्यासाठी अधिकृत पत्रच देऊ टाकले आहे. आता हा गडी काम करतो की सैराटच पाहतो हे कळेल.

नागराज मंजुळेंना भेटायची हनुमंतरावांना इच्छा आहे. त्याला चित्रपटात काम करायची इच्छा आहे. नागराजची एखाद्यावर नजर पडली तर त्या कलाकाराचे जीवनच बदलते हे आपण ऐकले आणि पाहिले देखील आहे. कोण जाणे हा हनुमंत उंच भरारी घेईल.

The post सैराट वेडा प्रेक्षक; तब्बल १०५ वेळा पहिला चित्रपट appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *