March 12, 2017

सिंधूचे फॅन आहेत थलैवा

Written by

pv-sindhu

pv-sindhu
पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः पाऊस पडत असून आपल्या शैलीत प्रत्येकजण तिला शुभेच्छा देत आहे. तिच्या कामगिरीचे बॉलीवूडपासून ते क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकजण कौतुक करत आहे.

संघर्षपूर्ण लढतीत स्पॅनिश खेळाडू कॅरोलिन मारिनने सिंधूचा पराभव केल्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र तिच्या या कामगिरीचे कौतुक सुपरस्टार रजनीकांत यांनीही केले आहे. रजनीकांत ट्विटरवर फारसे अॅक्टिव्ह नसतात मात्र सिंधूसाठी त्यांनी आवर्जून ट्विट केले आहे.

रजनीकांत हे ट्विट करताना म्हणाले की, हॅट्स ऑफ सिंधू, मी तुझा सर्वात मोठा फॅन बनलो आहे. अभिनंदन ! ज्या रजनीकांत यांना जगातील कोटीच्या कोटी फॅन देव मानतात, त्यांनीच एखाद्याचा फॅन असल्याचे सांगणे म्हणजे त्याची चर्चा होणारच. त्यानंतर व्हायचे ते झालेच, रजनीकांत यांच्या ट्विटला लाखो लोकांनी लाईक तसेच रिट्विट केले आहे.

The post सिंधूचे फॅन आहेत थलैवा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *