March 12, 2017

साक्षी-सिंधूच्या संघर्षाच्या काळात आपण कोठे होतो – नाना पाटेकर

Written by

nana-patekar

nana-patekar
पुणे : भारतीय दोन महिला खेळाडूंनी रिओ ऑलिंम्पिकमध्ये प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर देशाचे नाव राखल्यामुळे त्यांच्यावर सध्या होत असलेल्या कौतूकावरून अभिनेता नाना पाटेकर यांनी सर्वांनाच खडे बोल सुनावले आहेत. साक्षी मलिक आणि पी. व्ही. सिंधू यांनी देशाचे नाव उज्ज्वल करत पदक जिंकल्यामुळे त्यांची आज नावे घेतली जात आहेत. मात्र, त्यांच्या संघर्षाच्या काळात आपण कोठे होतो. पदक जिंकण्यासाठी त्यांनी काय केले हे आपणाला माहित आहे का? आपण त्यांना काय देतो? असा अंतर्मूख करणारा सवाल नाना पाटेकर यांनी विचारला आहे.

आपले परखड मत व्यक्त करताना नाना म्हणाले, भारतात गोल्फ नावाचा खेळ नाही. परंतु आदीती अशोक हिने हा गेम कुठे नेऊन ठेवला आहे बघा. सगळे आज सिंधुचे नाव घेत आहेत. परंतु या लोकांना आपण काय देतो, असा सवाल नानांनी विचारताच सर्वचजण क्षणभर काहीसे स्तब्ध झाले.

ऑलिम्पिक खेळाडूंबद्धल चूकीचे ट्विट करणाऱ्या लेखिका शोभा डे यांचाही नानांनी आपल्या खास शैलित समाचार घेतला. नाना या वेळी म्हणाले, चार-आठ वर्षांनी ऑलिम्पिक आल्यावर टी. व्ही. पुढे बसायचे आणि पदक मिळाल्यावर कौतुक करायचे, नाही मिळाले तर कोणी तरी काहीतरी कमेंट करायची, असे चालणार नाही.

नाना पाटेकर यांनी या वेळी बोलताना चीनचे उदाहरण दिले. तसेच भारताने काय करायला हवे हेही सांगितले. ते म्हणाले, चीनने दहा वर्ष आपले खेळाडु पाठवले नाहीत. पुढे त्यांनी १०० मेडल मिळवली. प्रिपरेशन नावाची काही गोष्ट असते की नाही, असा सवाल उपस्थित करुन देशातील व्यवस्थेवरील दोषांवर त्यांनी नेमके बोट ठेवले.

समाजोपयोगी कार्यासाठी अभिनेता नाना पाटेकर हे नेहमीच तत्पर असतात. अभिनयाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यावर त्यांनी आपले लक्ष जनकल्याणाकडे वळवले आहे. दुष्काळपरिस्थितीत नानांनी लोकसहभागातून अफलातून कामगिरी केली आहे. अभिनेता मकरंद अनासपूरे या अभिनेत्याला सोबत घेऊन ‘नाम’ नावाची संस्था स्थापन केली. तसेच, लोकसहभागातून जलनियोजनाची अनेक महत्वाची कामे केली. त्याला लोकांचा पाठिंबाही मोठ्या प्रमाणावर मिळाला.

The post साक्षी-सिंधूच्या संघर्षाच्या काळात आपण कोठे होतो – नाना पाटेकर appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *