March 12, 2017

साक्षी रिओच्या समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक

Written by

sakshi-malik

sakshi-malik
रिओ दी जेनेरियो – मागील दोन आठवड्य़ांपासून ब्राझीलचे शहर रिओ दी जानेरिओमध्ये सुरू असलेल्या ३१ व्या ऑलिम्पिक खेळांच्या महाकुंभाचे रविवारी सूप वाजले. या समारोप समारंभात भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला ध्वजधारकाचा मान देण्यात आला. साक्षीने मारकाना स्टेडियमवर भारताचा ध्वज फडकावला.

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅटमिंटन एकेरीत रौप्यपदक मिळविणारी पी.व्ही.सिंधू भारताकडे रवाना झालाल्यामुळे साक्षीला हा मान देण्यात आला. रिओ ऑलिम्पिकमध्ये याच दोन खेळाडूंनी भारतासाठी पदक जिंकले आहे. रविवारी रात्री झालेल्या समारोप सोहळ्यात सर्वच देशांचे खेळाडू आपला ध्वज घेऊन सहभागी झाले होते.

उद्घाटन सोहळ्यात नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचा ध्वजधारक होता. साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारताला ब्राँझपदक मिळवून दिले होते. साक्षीने भारतासाठी पहिले पदक मिळविल्याने समारोप सोहळ्यात तिला हा मान देण्यात आला. या ऑलिंपिकमध्ये भारताला फक्त दोन पदक मिळविण्यात यश आले. भारताला साक्षीने ब्राँझ आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू रौप्य पदक मिळवून दिले. यामुळे दोन पदकांसह भारत पदकतालिकेत ६७ व्या स्थानावर राहिला. भारतीय ऑलिम्पिक संघ (आयओए)चे अध्यक्ष एन. रामचेद्रन यांनी रिओमध्ये पदकविजेत्या दोन्ही खेळाडूंचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

The post साक्षी रिओच्या समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *