March 12, 2017

सर्वांसाठी उपलब्ध झाली फेसबुकची लाईव्ह व्हिडीओ सुविधा

Written by

facebook

facebook
मुंबई : आपल्या सर्व यूझर्सना जगभरातील नेटसॅव्हींच्या पसंतीची सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने लाईव्ह व्हिडीओ शेअरिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ फेसबुकच्या अँड्रॉईड किंवा आयओएस अॅपच्या माध्यमातून घेता येणार आहे.

फेसबुक युझर्स या सुविधेचा पर्याय आपल्या स्मार्टफोनवर स्टेटस अपडेट करताना पाहू शकतील. अँड्रॉईड यूझर्सना हा पर्याय स्टेटस बॉक्समध्ये ‘Go Live’ या नावाने दिसेल. तसेच आयओएस यूझर्सना हा पर्याय स्टेटस बॉक्समध्ये ‘Live Video’ नावाने उपलब्ध असेल. फेसबुक यूझर्स या सुविधेचा वापर करून फेसबुकवर लाईव्ह राहू शकतात. यापूर्वी ही सुविधा फक्त सेलिब्रिटी किंवा व्हेरिफाईड पेजनाच होती. पण आता फेसबुकवरील प्रत्येकाला ही सुविधा वापरता येणार आहे.

The post सर्वांसाठी उपलब्ध झाली फेसबुकची लाईव्ह व्हिडीओ सुविधा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *