March 12, 2017

सर्वप्रथम भागवतांनी १० मुले जन्माला घालावीत

Written by

arvind-kejriwal

arvind-kejriwal
नवी दिल्ली- सरसंघचालक मोहन भागवत यांनी आगरा येथे देशातील कुठलाही कायदा हिंदूनी अधिक मुले जन्माला घालू नये असे म्हणत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर अतिशय खोचक अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना आधी १० मुलांना जन्माला घालावे आणि त्यांचे पालन पोषण व्यवस्थितरित्या करुन दाखवावे आणि नंतरच हिंदूंना असे सल्ले द्यावेत असे म्हटले आहे. हिंदुंची डोके भडकवण्याचे काम मोहन भागवत करतात. भागवतांनी असे डोके भडकवण्याआधी १० मुले जन्माला घालावीत असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

मोहन भागवत यांनी हे वक्तव्य आगरा येथे शिक्षकांना मार्गदर्शन करताना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून प्रतिक्रिया आल्या होत्या. भागवत हे केवळ धर्मावरच बोलतात. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षित आहे असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. शेवटी कुणी किती मुले जन्माला घालावी हा दाम्पत्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे असे देखील त्यांनी पुढे म्हटले होते.

The post सर्वप्रथम भागवतांनी १० मुले जन्माला घालावीत appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *