March 12, 2017

सचिनच्या हस्ते सिंधूला बीएमडब्लू भेट

Written by

pv-sindhu

pv-sindhu
हैदराबाद – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते भारताला रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला बीएमडब्लू कार देण्यात येणार आहे.

सिंधूला ही कार सचिन तेंडुलकरचा मित्र आणि हैदराबाद बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांच्यातर्फे भेट देण्यात येणार आहे. पण, सिंधूला ही कार सचिनच्या हस्ते भेट देण्याचे चामुंडेश्वरनाथ ठरविले आहे. सिंधूला कार भेट देण्याचा कार्यक्रम २७ ऑगस्टला होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. यापूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक मिळविणाऱ्या सायना नेहवालला सचिनच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली होती. तसेच १९ वर्षांखालील युवा आशियाई स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद मिळविणाऱ्या सिंधूला २०१२मध्ये मारुती कार देण्यात आली होती.

The post सचिनच्या हस्ते सिंधूला बीएमडब्लू भेट appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *