March 12, 2017

श्रीनगरमधील बहुतांश भागातील संचारबंदी उठवली

Written by

kashmir

kashmir
श्रीनगर- श्रीनगरमधील बहुतांश भागांमधील संचारबंदी परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उठविण्यात आली असून काश्मीर खोऱ्यातील सार्वजनिक जनजीवन मागील सलग ४६ दिवसांपासून विस्कळीत झाले आहे.

संचारबंदी उठविण्यात आली असली तरी काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणामही कायम राहणार आहे. हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा म्होरक्या बुऱ्हान वणी याला ठार करण्यात आल्यावर उसळलेल्या हिंसाचारामुळे येथे बंद पाळण्यात आला होता, तसेच सार्वजनिक जीवनात निर्बंध घालण्यात आले होते.

काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांमध्ये परिस्थितीत सुधारणा झाल्याने लोकांच्या हालचालींवरील प्रतिबंध काढण्यात आले आहेत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रीनगरमधील बारा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आठ तास संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने हा निर्णय घेण्यात आला.

The post श्रीनगरमधील बहुतांश भागातील संचारबंदी उठवली appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *