March 12, 2017

शंभर अब्ज डॉलर्सच्या निधीचे काय?

Written by

g-20

g-20
‘जी-२०’ परिषदेत भारत करणार विकसित राष्ट्रांना सवाल
बीजिंग: संतुलित विकासासाठी विकसित राष्ट्रांकडून विकसनशील राष्ट्रांना १०० अब्ज डॉलर्सचा निधी उभा करून देण्याच्या आश्वासनांचे काय झाले; हा प्रश्न भारत विकसनशील राष्ट्रांच्या वतीने जी-२० परिषदेत उपस्थित करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

जागतिक तापमानवाढीला आळा घालण्यासाठी करण्याच्या उपायोजनांमुळे होणारा वाढीव खर्च आणि विकास प्रक्रियेला बसणारी खीळ यातून मार्ग काढण्यासाठी हा निधी देण्याचे आश्वासन मागील परिषदेत विकसित राष्ट्रांच्या वतीने देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्तता केली जावी; यासाठी या परिषदेत पाठपुरावा केला जाईल; असे अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले. सध्या या आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू असल्याचे दिसून येत नाही; असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हरितगृह वायूंचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्याधुक तंत्रज्ञानाचा वापर आणि संतुलित विकास यासाठी हा निधी देण्याचे आश्वासन ६ वर्षांपूर्वी देण्यात आले होते. हा निधी सॅन २०२० पर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संरचनात्मक बदल घडवून आणण्याची नितांत आवश्यकता असून त्याकडे जगाचे लक्ष वेधण्याचाही या परिषदेत प्रयत्न केला जाईल; असेही दास यांनी सांगितले. रचनात्मकी सुधारणांसाठी धोरण निश्चिती करण्याचा भारताचा आग्रह असेल; असे त्यांनी नमूद केले.

भारताने आर्थिक उदारीकरणासाठी मागील दोन वर्षात मोठी पावले उचलली असून सध्या भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था ठरल्याचा दावा करून दास म्हणाले की; थेट परकीय गुंतवणुकीला भारताने मोठा वाव निर्माण करून दिला आहे.

ही परिषद आशियात होत असल्याने त्यात अधिक सामाईकता असेल; असा विश्वास व्यक्त करून दास म्हणाले की; स्थायी आर्थिक उद्दीष्ट आणि नावीन्यपूर्ण मार्गांचा विलंब करून सामाईक विकास हे या परिषदेच्या आयोजनाचे मुख्य कारण आहे. युरोपियन देश हे यापूर्वीच विकसित झालेले आहेत. मात्र आशियाई देशांना सामाईक विकास साधण्याची नितांत आवश्यकता आहे. ही परिषद आशियात होत असल्यामुळे आशियाई देशांमध्ये एकात्मतेची भावना अधिक प्रबळ होईल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

The post शंभर अब्ज डॉलर्सच्या निधीचे काय? appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *