March 12, 2017

वालचंद कॉलेजच्या जागेवर पृथ्वीराज देशमुखांचा डोळा : आप

Written by

priti-menon

priti-menon
मुंबई : आम आदमी पक्षाने भाजप आमदार आशिष शेलार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आता आपला मोर्चा राज्याच्या शिक्षण क्षेत्राकडे वळवला असून सांगलीतील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगची सुमारे ११० एकर जमीन भाजपचे सांगलीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी बळकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

मुंबईत या संदर्भात ‘आप’ नेत्या प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रीती मेनन म्हणाल्या की, बळाचा वापर करुन पृथ्वीराज देशमुख वालचंद कॉलेजचा कारभार हाती घेण्याचा प्रयत्न करत आहे. २४ मे २०१६रोजी देशमुख यांनी पुण्यात वालचंद कॉलेजच्या कार्यालयावर हल्ला केला होता. या प्रकरणी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर कारवाई होऊन ते जेलमध्ये असायला हवे होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळेच पृथ्वीराज देशमुख सध्या मोकाट फिरत आहेत. तसेच या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयातूनही पृथ्वीराज देशमुख यांना मदत मिळत असल्याचा दावा प्रीती मेनन यांनी केला आहे.

The post वालचंद कॉलेजच्या जागेवर पृथ्वीराज देशमुखांचा डोळा : आप appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *