March 12, 2017

ललिता बाबर होणार क्लास वन ऑफिसर

Written by

lalita-babar

lalita-babar
मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी करणारी साताऱ्याची धावपटू ललिता बाबरला राज्य सरकार क्लास वन अधिकारीपदी नोकरी देणार असल्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती ललिताने दिली आहे.

ऑलिम्पिकपूर्वीच राज्य सरकारने मला मदत केली होती, तसेच आता ऑलिम्पिकनंतरही मदत करत असल्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आभारी असल्याचे ललिता म्हणाली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ललिताने भेट घेतली. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी ललिताचा सत्कार केला. यावेळी ललिता म्हणाली, माझा ऑलिम्पिक प्रवास खुपच स्वप्नवत होता. पी टी उषानंतर पहिल्यांदाच कोणी महिला आणि त्यातही महाराष्ट्रातील खेळाडूने ऑलिम्पिकची फायनल गाठली याचा आनंद आहे. मात्र रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या चुका झाल्या, त्या टाळून आता २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे ललिता म्हणाली.

The post ललिता बाबर होणार क्लास वन ऑफिसर appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *