March 12, 2017

रेल्वे स्टेशनवर आजपासून चाकरमान्यांना मिळणार फुकटात वायफाय

Written by

wifi

wifi
मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी बऱ्याच सोयी सुविधा देऊ केल्या असून यात काही प्रमुख रेल्वेस्थानकांवर वायफाय सुविधेसह हार्बर लाईनवर डब्यांची संख्याही आजपासून वाढवण्यात येणार आहे.

मुंबई सीएसटीमध्ये एसी डॉरमेटरी, पाण्यासाठी प्युरीफिकेशन प्लांट, दिव्यांग प्रवाशांसाठी बायो टॉयलेटसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. कुर्ला आणि ठाण्यात डिलक्स टॉयलेटसारख्या सुविधेसह महालक्ष्मी स्थानकात पेड टॉयलेटची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. कल्याण आणि गोवंडीमध्ये नवीन टॉयलेट सुरू करण्यात येणार असून खार रोडवर नम्मा टॉयलेटची नवी सुविधा पुरवली जाणार आहे. याशिवाय बोरिवली स्थानकावर नवीन बुकिंग ऑफिससोबत नवी इमारतही प्रवाशांच्या सेवेत रूजू होईल. तसेच नालासोपारा गोरेगाव येथेही नव्या बुकिंग ऑफिसची सोय करण्यात आली आहे.

या स्थानकांवर मिळणार वायफाय सेवा
कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर सेंट्रल , बांद्रा टर्मिनस, दादर पश्चिम, चर्चगेट, बांद्रा आणि खार रोड स्टेशनवर मोफत वायफाय सेवा दिली जाणार आहे.

The post रेल्वे स्टेशनवर आजपासून चाकरमान्यांना मिळणार फुकटात वायफाय appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *