March 12, 2017

रिओचा शानदार समारोप समारोह

Written by

rio

rio
रिओ – शानदार कार्यक्रमाने या ब्राझीलच्या शहरात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप करण्यात आला. जगातील सर्वात मोठ्या खेळाच्या स्पर्धेत मागील १६ दिवस २०६ देशांतील १० हजारापेक्षाही जास्त खेळाडूंनी आपल्यातील कर्तृत्व साऱ्या जगाला दाखवले.

हे खेळाडू आता आपापल्या पदकांसह मायदेशी परततील आणि आपल्या यशाचा जल्लोष साजरा करतील. जे अपयशी ठरले ते पराभवाचे विश्लेषण करतील व टोकियो २०२० मध्ये पुन्हा आपल्या नावास साजेशी कामगिरी करण्यास सज्ज होतील.

पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धांवर अमेरिकेने त्यांचीच हुकुमत असल्याचे दाखवून दिले. त्यांनी ४६ सुवर्णपदके जिंकली तसेच या स्पर्धेत १०० पेक्षा जास्त पदके जिंकणारा अमेरिका एकमेव देश बनला. इंग्लंडने २७ तर चीनने २६ सुवर्ण मिळवून ते अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले.

या स्पर्धेत भारताचा विचार केल्यास फक्त दोन पदके आपल्याला जिंकता आली. भारताने या स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले. रौप्यपदक बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जिंकले तर कांस्यपदक कुस्तीपटू साक्षी मलिक हिने पटकावले. मात्र मागील दोन ऑलिम्पिक स्पर्धांपेक्षा ही कामगिरी साधारण आहे.

भारतीय महिलांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची मान उंचावली. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू रौप्य जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनली. साक्षी मलिकने कुस्तीत कांस्य पटकावले. तर दीपा कर्माकरने १२० वर्षांच्या इतिहासात भारताला प्रथमच जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम फेरीत पोहोचवले. त्याचसोबत धावपटू ललिता बाबरने ३२ वर्षांनंतर ट्रॅक अॅन्ड फिल्ड प्रकारात भारताकडून अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले. गोल्फपटू आदिती अशोक हिने अंतिम फेरीत प्रवेश मिळवून ४१ व्या स्थानी राहिली.

The post रिओचा शानदार समारोप समारोह appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *