March 12, 2017

राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने साक्षीचा सन्मान

Written by

sakshi-malik

sakshi-malik
लखनौ : रिओ ऑलिम्पिक कांस्यविजेत्या साक्षी मलिकला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

आम्ही रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल साक्षीचे अभिनंदन करतो आणि तिला आमच्या सरकारतर्फे राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला असल्याचे अखिलेश यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी जाहीर केले.

राणी लक्ष्मीबाई यांची कांस्यमूर्ती, मानपत्र व रोख ३.११ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणा-या प्रतिभावान क्रीडापटूंना हा पुरस्कार दिला जातो. हरियाणाच्या साक्षीने बुधवारी रिओ ऑलिम्पिकमधील भारतची पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आणताना महिलांच्या 58 किलो गटातील कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले. या पदकासाठी झालेल्या लढतीत तिने किर्गीस्तानच्या तिनीबेकोव्हावर 8-5 असा सनसनाटी विजय मिळविला होता.

The post राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने साक्षीचा सन्मान appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *