March 12, 2017

राज्यातील महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

Written by

bmc

bmc
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून मुंबई महापालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि इतर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २०१७च्या फेब्रुवारीत निवडणूक अपेक्षित असून त्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भातली कार्यवाही ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना २२ नोव्हेंबरला काढली जाणार आहे. मुंबई महापालिकेसारखाच राज्यातल्या इतर नऊ महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक असण्य़ाची शक्यता असून मुंबईत वॉर्डच्या पुनर्रचनेमुळे अनेक वॉर्ड गायब होण्याची शक्यता आहे. तसेच काही नवीन वॉर्डंस निर्माण होणार असल्याने विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

The post राज्यातील महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *