March 12, 2017

रणवीरची इच्छा झाली पूर्ण

Written by

ranveer-singh

ranveer-singh
‘रणवीर चिंग रिटर्नस्’मध्ये आईच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दिसणार आहे. त्याची पडद्यावर आई साकारण्याची खूप जुनी इच्छा होती. त्याला ही भूमिका रोहित शेट्टीने दिल्याबद्दल रणवीरने त्याचे आभार मानले आहेत.

शुक्रवारी रोहित शेट्टी दिग्दर्शित आघाडीच्या फूड ब्रँडची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. सहा मिनीटांच्या या जाहिरातीत रणवीर सिंग आणि साऊथची सुपरस्टार तमन्ना भाटीया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावर रणवीर म्हणतो, मला नेहमी आईची भूमिका करावे असे वाटायचे. अखेरीस ही इच्छा रोहितने पूर्ण केली, रोहितचे आभार. रणवीरला थांबवत पटकन रोहित म्हणाला, तरी बरं, मी त्याला आई बनवले असे रणवीर म्हणाला नाही. जाहिरातीत रणवीर लोकांचा उपकारकर्ता दाखवण्यात आला आहे. अचाट शक्तीचे अॅक्शन सीन्स, रोमान्स, डान्स यात आहेत. एखाद्या चित्रपटासारखीच ही जाहिरात वाटते. यात रणवीरने आपल्या आईचीही भूमिका साकारली आहे.

अजय देवगण कंपनीने या जाहिरातीतील स्पेशल इफेक्टस बनवले आहेत. रणवीर दाखवत नसला तरी तो चांगला लेखकही आहे. याची मुळ संकल्पना रणवीरची असल्याचे राहितने सांगितले. या जाहिरातीचे संवाद मिलाप जव्हेरीने लिहिले आहेत.

The post रणवीरची इच्छा झाली पूर्ण appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *