March 12, 2017

यावर्षीपासून ‘नीट’च्या गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया

Written by

neet-exam

neet-exam
मुंबई : राज्य सरकारने राज्यातील शिक्षणसम्राटांना चांगलाच दणका दिला असून राज्यात यावर्षीपासून ‘नीट’च्या गुणवत्तेनुसार सामूहिक प्रवेश प्रक्रिया होणार आहे. सामूहिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने लागू केली आहे.

सामूहिक प्रवेश प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत घेण्यात आला. ‘नीट’च्या गुणवत्तेनुसारच प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थी आपल्या पसंतीच्या कॉलेजचे पर्याय देऊ शकतात. विशेष म्हणजे यावर्षीपासूनच या पद्धतीने प्रवेश होणार आहेत.

दरम्यान, राज्यातील अभिमत विद्यापीठांनी प्रवेशासाठी जाहिरात काढली होती. मात्र, अभिमत विद्यापीठं अशाप्रकारे परस्पर प्रवेश देऊ शकत नाहीत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व प्रवेश ‘नीट’च्या गुणवत्तेनुसारच होतील.

The post यावर्षीपासून ‘नीट’च्या गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *