March 12, 2017

मोदींच्या अज्ञानावर राहुल गांधींचा प्रश्न

Written by

rahul-gandhi

rahul-gandhi
नवी दिल्ली – स्वातंत्र्यानंतर भाजपला काँग्रेसच्या तुलनेत जास्त अडचणी सहन कराव्या लागले असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात केले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींच्या या अज्ञानावर प्रश्न उपस्थित करत आपल्या ट्विटर हँडलवर एक श्लोक लिहिला आहे. हा श्लोक लिहिण्या अगोदर त्यांनी स्पष्ट लिहिले आहे, की हा श्लोक म्हणजे पंतप्रधान मोदींचे अज्ञान नष्ट होण्याकरता केलेली प्रार्थना आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की ‘ मोदीजी मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे – असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, ओम शांती शांती शांती’. एवढेच नाही तर त्यांनी या श्लोकाचा अर्थही सांगताना लिहिले आहे, की ‘ अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून उजेडाकडे, आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे, सर्व जीवांसाठी शांती राहू दे’.

The post मोदींच्या अज्ञानावर राहुल गांधींचा प्रश्न appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *