March 12, 2017

मुख्यमंत्र्यांचा असा ही पूरस्थितीच्या पाहणीचा दौरा

Written by

cm

cm
पन्ना (मध्य प्रदेश) – जोरदार पावसामुळे मध्य प्रदेशमध्ये आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून पुरामुळे लोकांना घराबाहेर दिवस काढावे लागता आहेत. शेतीचे या पुरामुळे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मात्र या पुराची झळ फक्त मध्य प्रदेशमधील जनतेलाच नव्हे तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांनाही बसली आहे.

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पन्ना जिल्ह्यात पोहोचलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पुरातून जाणे अशक्य झाल्याने पोलिसांनी त्यांना पाण्यातून चक्क उचलून नेले आहे. पूरग्रस्त गावांचा दौरा करणा-या मुख्यमंत्र्यांना दुथडी भरुन वाहणारी नदी पार करण्यासाठी पोलिसांची अशा प्रकारे मदत घ्यावी लागली आहे. शिवराजसिंह यांना उचलून घेतलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आलेल्या पुराची व्याप्ती लक्षात येते आहे. उत्तर भारतातील चार मोठ्या राज्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

पुराने अनेक जिल्ह्यांना वेढले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पुरासंदर्भात अऩेक विदारक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत असल्यामुळे मध्य प्रदेश सरकारने पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करावी, अशी भावना जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

The post मुख्यमंत्र्यांचा असा ही पूरस्थितीच्या पाहणीचा दौरा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *