March 12, 2017

महिला दुहेरीच्या क्रमवारीत सानिया अव्वल

Written by

sania-mirza

sania-mirza
नवी दिल्ली – देशाच्या शिरपेचात भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने आणखी एक मानाचा तुरा खोवला असून चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने सिनसिनाटी ओपन जिंकण्याचा पराक्रम सानियाने गाजवला. सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीचे हे पहिलेवहिले विजेतेपद ठरले. मार्टिना हिंगिस-वॅन्देवेग जोडीवर सानिया मिर्झा आणि बार्बरा स्ट्रायकोव्हा जोडीने ७-५, ६-४ अशी मात करीत सिनसिनाटी ओपनचे विजेतेपद पटकवले.

सानियाने या विजयामुळे महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत वैयक्तिकरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली. या आधी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस संयुक्तरित्या अव्वल स्थानावर होत्या. विशेष म्हणजे, सिनसिनाटी ओपनच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झाने आपली आधीची सहकारी मार्टिना हिंगिसला धूळ चारली.

The post महिला दुहेरीच्या क्रमवारीत सानिया अव्वल appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *