March 12, 2017

महाराष्ट्रातील एकही तेलंगणाच्या प्रकल्पात गाव बुडणार नाही

Written by

cm

cm
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीमहाराष्ट्राच्या हक्काचे पाणी महाराष्ट्राला मिळणार असून तेलंगणाच्या प्रकल्पात राज्यातील एकही गाव बुडणार नसल्याची ग्वाही दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तेलंगणा-महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर माहिती दिली. गोदावरी नदीवरील मेलिगड्डा कालेश्वर प्रकल्पावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रकल्पाचा बांधकाम खर्च तेलंगणा सरकार करणार असून प्रकल्पांतर्गत नदीवर तीन बॅरेजेस बांधले जाणार आहेत.

तुमडी हेटी, मेडिकट्ट, चनाखा कोटट या ठिकाणी हे बॅरेज बांधले जाणार आहेत. तुमडीहेती उंची १५२ मीटर वरून १४८ मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ९ गावातील ११३ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे. मेडिकट्टची उंची १०० मीटर ठेवण्यात येणार आहे. राज्यातील ११ गावातील एकूण १५० हेक्टर क्षेत्र बुडीत होईल पण गावठाण बुडणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दोन्ही राज्यात योग्य समन्वय साधुन काम करु, केवळ गोदावरी नाही तर पुढच्या काळात कृष्णा नदी संदर्भात ही विविध प्रकल्पाबाबत आम्ही महाराष्ट्रशी चर्चा करु अशी माहिती तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली.

The post महाराष्ट्रातील एकही तेलंगणाच्या प्रकल्पात गाव बुडणार नाही appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *