March 12, 2017

मनसेचे यावर्षी ९ थरांसाठी ११ लाखांचे बक्षीस

Written by

mns

mns
ठाणे – उत्सवांच्या नावाखाली राजकीय पक्ष नेहमीच स्पर्धा करीत असतात, मग तो गणेशोत्सव असो की नवरात्र असो. दहीहंडी उत्सव देखील गेल्या काही वर्षात याच स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादल्याने अनेक जण हिरमुसले आहेत. परंतु यात आता मनसेने उडी घेत थेट न्यायालयालाच आव्हान दिले असून मनसेने या वर्षी सगळे निर्बंध झुगारून ९ थरांची दहीहंडी बांधून यशस्वी पथकाला ११ लाखांचे घसघशीत बक्षीस देण्याचा चंग बांधला आहे.

मुंबई आणि उपनगरात सध्या तुम्ही तयारीला लागा, कायद्याचे काय ते मी बघतो असे बॅनर झळकावत त्यांनी ९ थरांच्या हंडीचे आयोजन केले आहे. ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचे बक्षीस जाहीर करून त्यांनी जणू न्यायालयाच्या आदेशाची खिल्ली उडवली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत असतानाच दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी आता पोलीस कारवाईला देखील सामोरे जाणार आहेत.

दरवर्षी अनेक गोविंदा दहीहंडीच्या दिवशी जखमी होतात किंवा क्वचित प्रसंगी एखाद्याचा जीव देखील जातो. अगदी वरच्या थरावर सात आठ वर्षांची चिमुकली मुले चढवले जातात, त्यामुळे आता न्यायालयाने यामध्ये मध्यस्थी करत २० फुटांपेक्षा उंच हंडी बांधण्यास मज्जाव केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेच १८ वर्षांखालील मुलांना देखील गोविंदा पथकात सामील करता येणार नाही अशी अट घातल्याने सगळेच गोविंदा हिरमुसले आहेत. बहुतेक सगळे दही हंडी आयोजक हे राजकीय पक्षाचे नेते असून या वादात आता मनसेने देखील उडी घेत थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाच आवाहन दिले आहे.

The post मनसेचे यावर्षी ९ थरांसाठी ११ लाखांचे बक्षीस appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *