March 12, 2017

मध्य इटलीमध्ये भूकंप, अख्खे गावच ढिगाऱ्याखाली

Written by

earthquake

earthquake
रोम – आज पहाटे मध्य इटली भूकंपाच्या धक्क्याने हादरली. येथे पहाटे ३.३० वाजता ६.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपात एका गावाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

या भूकंपाने रेयटीसह रोमही हादरले आहे. भूकंपानंतर रेयटी येथील नागरिक रस्त्यावर आले. तर अनेक इमारती कोसळल्याची माहिती रेयटीच्या महापौरांनी दिली आहे. भूकंप एवढा तीव्र होता की, ढिगाऱ्यांखाली गावच नाहीसे झाल्याचे ते म्हणाले. युरोपियन भूमध्य भूकंप केंद्राने हा भूकंप ६.१ तीव्रतेचा असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने हा भूकंप ६.२ तीव्रतेचा म्हटले आहे.

The post मध्य इटलीमध्ये भूकंप, अख्खे गावच ढिगाऱ्याखाली appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *