March 12, 2017

भुजबळांच्या फार्महाऊसवर ईडीचा ताबा!

Written by

farmhouse

farmhouse
नाशिक : छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक थेट पोहोचले असून हे पथक छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसचा ताबा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा छगन भुजबळ यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

भुजबळ फॉर्महाऊसवर एसीबीचे एक विशेष पथक देखील दाखल झाले आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर याच ठिकाणी भुजबळांचा मुक्काम असे. या पूर्वी भुजबळांची जमीन ताब्यात घेण्याचे आदेश होते, त्या जमीनीला उच्च न्यायालयात पुन्हा आव्हान देण्यात आले होते. आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे पथक भुजबळांचे फार्म हाऊस ताब्यात घेण्यासाठी पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते समजले जाणारे भुजबळ हे मागील अनेक महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. भुजबळांनी राज्याचे गृहखात आणि उपमुख्यमंत्रीपदही सांभाळले होते, मात्र आता भुजबळ अतिशय अडचणीत आले आहेत.

The post भुजबळांच्या फार्महाऊसवर ईडीचा ताबा! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *