March 12, 2017

भारत-म्यानमार सीमेला भूकंपाचा धक्का

Written by

earthquake

earthquake
नवी दिल्ली – आज सकाळी भारत-म्यानमार सीमेवरील गावांसह ईशान्येकडील काही राज्यांना भूकंपाचा धक्का बसला आहे.

याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी होती. या भूकंपामुळे अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा धक्का जाणविण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर मोकळ्या जागेत आश्रय घेतला. म्यानमारमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.

The post भारत-म्यानमार सीमेला भूकंपाचा धक्का appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *