March 12, 2017

भारताने दिलेले दाऊदचे सहाही पत्ते अचूक

Written by

dawood

dawood
संयुक्त राष्ट्रसंघ- भारताने पाकिस्तानातील दाऊद इब्राहिम राहत असलेल्या ठिकाणांचे दिलेले नऊपैकी सहा पत्ते अचूक असल्याचा दुजोरा संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) दिला आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे पाकिस्तानने मात्र दाऊदचा ठावठिकाणा माहीतच नसल्याचा कांगावा केला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंध समितीकडे दाऊदचे नऊ पत्ते भारताने सादर केले होते, आणि दाऊदला आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तानविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यावर ‘युनो‘ने त्या पत्त्यांना दुजोरा दिला. त्यापैकी तीन पत्ते चुकीचे असल्याने ते यादीतून काढून टाकण्यात आले आहेत.

१९९९, २०११ आणि २०१५मधील ठरावांनुसार २२ऑगस्ट २०१६रोजी त्या कागदपत्रांमध्ये अधोरेखित करून व खोडून सुधारणा केल्या. इसिस आणि अल-कायदासंबंधित निर्बंध यादीतील संपत्ती जप्ती, प्रवास बंदी, शस्त्रबंदी घालावयाच्या व्यक्ती व संस्थांच्या यादीत दाऊदचे नाव घेतले. भारताने दिलेल्या नऊ पत्त्यांपैकी तीन पत्ते खोडण्यात आले. त्यापैकी एक पत्ता पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांच्या पत्त्याशी मिळताजुळता होता.

The post भारताने दिलेले दाऊदचे सहाही पत्ते अचूक appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *