March 12, 2017

भारताच्या सुरक्षा उपायात लुडबूड करू नका

Written by

china

china
भारतीय लष्कराने चिनी सैन्याला भरला सज्जड दम
नवी दिल्ली: भारतीय सीमांवर असलेले संभाव्य धोके आणि ते टाळण्यासाठी करण्याच्या उपाययोजना याबाबत निर्णय घेण्यासाठी भारतीय लष्कर मुखत्यार असून त्यामध्ये बीजिंगच्या दबावाला बाली पडणार नाही. त्यामुळे भारताच्या सुरक्षा उपायांमध्ये लुडबूड करणे चिनी सैन्याने थांबवावे; अशा शब्दात भारतीय लष्कराने सज्जड दम भरला.

अरुणाचल प्रदेशाच्या काही भूभागावर चीनने केलेला दावा आणि चिनी लष्कराने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे वाढते प्रकार; या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने चीनच्या सीमेवरील सुरक्षा अधिक कडक केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरुणाचल प्रदेशात स्वनातीत ‘ब्राम्होस’ क्षेपणास्त्रे लष्कराने तैनात केली आहेत. मात्र, भारताच्या या कृत्याने चीनच्या तिबेट आणि युन्नान या प्रदेशातील सुरक्षितता धोक्यात आली असून हे कृत्य चिथावणीखोर आहे; अशी टीका चिनी सैन्याने केली होती. मात्र या टीकेला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देताना; भारतीय भूभागातून भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यापासून भारतीय लष्कराला चीन रोखू शकत नाही; असे नमूद केले आहे.

‘ब्राम्होस’ हे भारतीय लष्कराच्या ताफ्यातील अत्यंत शक्तिशाली स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा पाणबुडीतून, युद्धनौकेतून, विमानातून, जमिनीवरून प्रभावी वापर करता येतो. तब्बल ३०० किलो स्फोटके धारण करण्याची क्षमता असलेले ‘ब्राम्होस’ जमिनीवर अथवा समुद्रात लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. लष्कराच्या ताफ्यात सन २००७ पासून कार्यरत असलेल्या ‘ब्राम्होस’ची हवाई दलाच्या सुखोई आय-३० या लढाऊ विमानातून त्याचा वापर करण्याच्या चाचण्या सुरू आहेत.

अरुणाचल प्रदेशसह ईशान्य भारतात चीनच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता भारताने भारत चीन सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे. ‘ब्राम्होस’ तैनात करण्याबरोबरच सीमावर्ती भागात अनेक रस्ते आणि अत्याधुनिक धावपट्ट्या भारताकडून उभारल्या जात आहेत.

The post भारताच्या सुरक्षा उपायात लुडबूड करू नका appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *