March 12, 2017

भारताच्या तीन अॅथलिस्टला झिकाची लागण?

Written by

zika

zika
मुंबई – भारतीय अॅथलेटिक्स रिओ ऑलिम्पिक स्पर्धा आटपून आपापल्या स्वगृही परतले आहेत. मात्र, या अॅथलेटिक्सपैकी धावपटू कविता राऊत, सुधा सिंग आणि ओपी जैशा या तिघींनाही सध्या व्हायरल फिवर झाला आहे. तसेच तिघींनाही अंग दुखीचा त्रास जाणवत आहे.

सुधा सिंग, ओपी जैशा आणि कविता राऊत या तिघींनाही व्हायरल फिव्हर झाला असून अंग दुखीचा त्रास होत असल्यामुळे तिघींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. जगभरात थैमान घालणा-या झिका व्हायरसची या तिघींनाही लागण झाली आहे का याचीही तपासणी करण्यात येत आहे.

सुधा सिंग, ओपी जैशा आणि कविता राऊत या तिघींनीही नुकत्याच पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. रिओ ऑलिम्पिकमधून परत आल्यानंतर तिघीही आजारी पडल्या आहेत. तिघीही एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. या तिघींनाही ताप, डोकेदुखी, घशाला सूज आलेली आहे. तसंच रक्तदाबही कमी झालाय. यामुळे डेंग्यू आणि मलेरियासोबतच झिका व्हायरसची लागण झाली आहे का याची चाचणी करण्यात येत आहे. तब्बेत बरी नसल्याने आणि संशय वाटत असल्यामुळे सावधानता म्हणून ही चाचणी करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी झिका व्हायरसने प्रचंड धूमाकुळ घातला होता. कविता राऊतचे रक्ताचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले असून अजून चाचणीबाबतचे रिपोर्ट्स अजून आलेले नाही.

The post भारताच्या तीन अॅथलिस्टला झिकाची लागण? appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *