March 12, 2017

बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले

Written by

airforce

airforce
चेन्नई: सुमारे एक महिन्यापूर्वी बंगालच्या उपसागराच्या परिसरात बेपत्ता झालेल्या विमानाचे काही अवशेष शोधपथकाच्या असून ज्या ठिकाणी अवशेष सापडले त्याच्या आजूबाजूच्या परिसराची अधिक कसून पाहणी केली जाणार आहे.

तांबारम येथील हवाई दलाच्या तळावरून पोर्ट ब्लेअरकडे जाण्यासाठी दि. २२ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता उड्डाण केलेले भारतीय हवाई दलाचे विमान १५ मिनिटातच संपर्क तुटून गायब बंगाल उपसागराच्या परिसरात बेपत्ता झाले. या विमानात २९ जण प्रवास करीत होते.

या विमानाच्या शोधासाठी बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आलेल्या जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ‘समुद्र रत्नाकर’ या शोधनौकेला या विमानाचे काही अवशेष चेन्नईच्या किनाऱ्यापासून १५० सागरी मैलाच्या अंतरावर तब्बल साडेतीन किलोमीटर खोलवर सापडले आहेत. हे अवशेष सापडल्यानंतरही काही काळ शोधकार्य जारी ठेवण्यात आले. मात्र त्यामध्ये काही सापडू शकले नाही. मात्र ‘समुद्र रत्नाकर’वरील शोधपथक पुन्हा एकदा या परिसराची सखोल पाहणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर या विमानाचे अवशेष शोधकर्त्यांच्या हाती लागले आहेत. ही शोधनौका मल्टी बीम इको साऊंडर, प्रोफायलर आणि साईड स्कॅन सोनार अशा अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज आहे. १६ हजार चौरस किलोमीटर सागरी क्षेत्रात शोधकार्य करण्याची जबाबदारी ‘समुद्र रत्नाकर’वर सोपविण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेच्या सागर निधी या नौकेलाही या शोधकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

The post बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *