March 12, 2017

‘बँजो’च्या तालावर गणेश मंडळांना भेट !

Written by

banjo

banjo
रितेश देशमुख आणि नर्गिस फाक्रीचा नवा चित्रपट ‘बँजो’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून ‘बँजो’च्या टीमने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले असून गणेश उत्सवाच्या काळात ‘बँजो’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याकाळात पुणे आणि मुंबईतील महत्वाच्या गणेश मंदिरांना आणि गणेश मंडळांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या सिध्दीविनायक आणि पुण्याच्या दगडू शेठ हलवाई गणेश मंदिराला रितेश आणि नर्गिस भेट देतील. त्यांच्यासोबत अर्थात ‘बँजो’ हे वाद्यही असेल. गणेश उत्सव पुणे आणि मुंबईत खूपच मोठा असतो. यातील मानाच्या अनेक गणपतींना ‘बँजो’ टीम भेट देणार आहे.

याविषयी ‘बँजो’चे दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, आम्ही देवाला प्रार्थना करीत असतो ते प्रत्येक वाद्य पवित्र असते. गणेश उत्सवाच्या काळात प्रार्थना करण्यासाठी अनेक वाद्यांचा उपयोग केला जातो. विशेषतः बँजोवर गणपतीची अनेक गाणी वाजवली जातात. गणेश उत्सवाच्या काळात पुणे आणि मुंबईतील गणेशासमोर जाण्याचा मला आनेद होत आहे.

The post ‘बँजो’च्या तालावर गणेश मंडळांना भेट ! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *