March 12, 2017

पुणे विमानतळावर ललिता बाबरचे जोरदार स्वागत

Written by

mohan-bhagwat

lalita-babar
पुणे – आज पुणे विमानतळावर रिओ ऑलिंपिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळविणारी भारताची खेळाडू ललिता बाबर हिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

रिओ ऑलिंपिकमध्ये माणदेशी एक्सप्रेस अशी ओळख असलेल्या ललिता बाबरने अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. ती अंतिम फेरीत दहाव्या स्थानावर राहिली होती. पण, अंतिम फेरीत स्थान मिळविणारी भारतीय खेळाडू अशी तिची ओळख होत तिने राष्ट्रीय विक्रमही नोंदविला होता. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवाशी असलेल्या ललित बाबरचे भारतातून कौतुक करण्यात आले होते.

पुणे विमानतळावर तिचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आगमन होताच राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दिलीप कांबळे यांनी तिचे स्वागत केले. तर, याबरोबरच आमदार जगदीश मुळीक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त आयुक्त नरेंद्र सोपल, माणदेश क्रीडा फाऊंडेशनचे पदाधिकारी, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

The post पुणे विमानतळावर ललिता बाबरचे जोरदार स्वागत appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *