March 12, 2017

‘पाक’ ठगांपासून सावध रहा

Written by

mumbai-police

mumbai-police
पोलिसांच्या ‘सायबर सेल’चे मोबाईलधारकांना आवाहन
मुंबई: आम्ही ‘कौन बनेगा करोडपती’मधून बोलत आहोत. या शोमध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकाला २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले असून तुमच्या क्रमांकाची निवड खुद्द ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी केली आहे; अशी बतावणी करणारे दूरध्वनी काही ठगांकडून मुंबई आणि आसपासच्या काही नागरिकांना येत आहेत. सावज जाळ्यात आल्यावर विविध कारणांनी त्यांच्याकडून हजारो ते लाखो रुपये उकळले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. हे दूरध्वनी पाकिस्तानातून येत असल्याचे राज्य पोलिसांच्या सायबर सेलच्या निदर्शनास आले आहे.

आपल्या सावजांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीकडून मोबाईलधारकांना एक चार आकडी क्रमांक सांगितलं जातो. आपल्या सीमकार्डच्या मागे हाच क्रमांक असल्याची खात्री करून घेण्यास सांगितले जाते. मोबाईलधारकाने खात्री करून घेतली असता तोच क्रमांक आढळून आल्याने त्यांचा दूरध्वनी करणाऱ्यांवर विश्वास बसतो. वास्तविक मोबाईल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून विशिष्ट सीमकार्डची सॅन[पूर्ण माहिती त्यांनी आधीच करून घेतलेली असते.

मोबाईलधारकांचा विश्वास संपादन केल्यानंतर बक्षिसाची रक्कम जमा करण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडावे लागेल; तुमच्या धनादेशावर खुद्द अमिताभ सही करणार आहेत; असे सांगून हे ठग त्यासाठी मोबाईलधारकांना ठराविक रक्कम विशिष्ट खात्यांमध्ये जमा करण्यास सांगतात. मात्र हि शुद्ध फसवणूक असल्याचे लक्षात येईपर्यंत मोबाईलधारक मोठी रक्कम गमावून बसलेला असतो. अशा प्रकारांबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास हे दूरध्वनी विदेशातून; विशेषतः: पाकिस्तानमधून आलेले असल्याने पोलीस फार काहीच करू शकत नाहीत. या दूरध्वनी क्रमांकाची सुरुवात +९२ किंवा ००९२ पासून सुरू होतो. त्यामुळे मोबाईलधारकांनी त्याबाबत काळजी घ्यावी; असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फसवणुकीचे हे प्रकार करण्यासाठी वापरले जाणारे दूरध्वनी क्रमांकही बोगस नावावर असतात आणि फसवणुकीचे प्रकार घडविल्यानंतर ते बंद केले जातात. तसेच पैसे जमा करण्यासाठी बँकांमध्ये उघडली जाणारी खातीही बनावट असून त्यातील पैसे काढून घेतल्यानंतर ती देखील बंद केली जातात; असे ‘सायबर सेल’चे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी सांगितले.

The post ‘पाक’ ठगांपासून सावध रहा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *