March 12, 2017

नारायण राणेंच्या भेटीला राज ठाकरे

Written by

rane

rane
मुंबई: आज नारायण राणेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. काल रुटीन चेकअपसाठी नारायण राणे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे लीलावती रूग्णालयात गेले होते. शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंही सेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा भेटीगाठी झाले आहेत. दरम्यान राज ठाकरे आणि राणे यांच्यात पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत.

The post नारायण राणेंच्या भेटीला राज ठाकरे appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *