March 12, 2017

धोनीला बायोपिकच्या राईट्ससाठी मिळाले ८० कोटी

Written by

dhoni1

dhoni1
मुंबई : भारतीय एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये सुशांतसिंह राजपूत धोनीची भूमिका करत आहे. खुद्द महेंद्रसिंग धोनीही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

धोनीला या चित्रपटाच्या राईट्ससाठी तब्बल ८० कोटी रुपये मिळाले आहेत. यातील २० कोटी रुपये धोनीला आधीच देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. बॉलीवूडमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेता-अभिनेत्रींनाही एवढी रक्कम मिळत नाही. जेवढे पैसे धोनीला देण्यात आले आहेत, तेवढी कमाई बहुतेक चित्रपटही करत नाहीत. धोनीच्या या बायोपिकचा टिझर आत्तापर्यंत १७ मिलियन लोकांनी यूट्यूबवर बघितला आहे. तर फेसबूकवरही हा चित्रपट ट्रेन्डिगमध्ये आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

The post धोनीला बायोपिकच्या राईट्ससाठी मिळाले ८० कोटी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *