March 12, 2017

‘धोनीः दी अनटोल्ड… ‘ चे नवे पोस्टर रिलीज

Written by

dhoni

dhoni
टीम इंडियाचा एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. दोन पोस्टर यापूर्वीच रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये धोनीच्या आयुष्यातील संघर्षाचा कोलाज दिसत आहे.
हे पोस्टर फॉक्स स्टार सिनेमाने ट्विटरवर शेअर केले असून ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट हिंदीसह, मराठी, तामीळ, तेलुगु भाषेत देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात धोनीच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे.

दिवसेंदिवस नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’ची उत्सुकता वाढतच चालली आहे. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओने केली आहे. सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका निभावण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांची भलीमोठी फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

The post ‘धोनीः दी अनटोल्ड… ‘ चे नवे पोस्टर रिलीज appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *