March 12, 2017

‘धूम ४’चा व्हिलन होणार शाहरुख ?

Written by

shahrukh-khan

shahrukh-khan
यशराज फिल्मसच्या बॅनरअंर्तगत बनविण्यात येणाऱ्या ‘धूम’ चित्रपटाच्या चौथ्या भागात सलमान खानच्या जागी शाहरुख खान काम करणार आहे. ‘धूम’चा सिक्वेल ‘धूम रिलोडेड’ वर निर्माता आदित्य चोप्राने काम करायला सुरुवात केली आहे.

सलमान खान ‘धूम रिलोडेड’ मध्ये व्हिलनची भूमिका करणार अशी चर्चा होती. आता ही भूमिका शाहरुख साकारणार आहे. ‘धूम’ चित्रपटात व्हिलनला खूप महत्व असते. पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसऱ्या भागात ह्रतिक रोशन आणि तिसऱ्या भागात आमिर खानने व्हिलन साकारले होते. आता ‘धूम रिलोडेड’ मध्ये तगडा व्हिलन पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशा वेळी शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही खूशखबरच आहे. आदित्य चोप्राने या भूमिकेसाठी आधी सलमानला संपर्क केला होता. पण तो सध्यातरी व्हिलनची भूमिका करण्याच्या मुडमध्ये नाही. त्यानंतर शाहरुखशी संपर्क झाला. त्याने ही भूमिका स्वीकारल्याचे सांगितले जाते.

The post ‘धूम ४’चा व्हिलन होणार शाहरुख ? appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *