March 12, 2017

देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Written by

rape

rape
हरदोई – उत्तर प्रदेशात महिलांवर होणारे अत्याचार प्रमाण काही कमी होत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून येथे आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना घडली. देशाचे रक्षण करणाऱ्या एका सैनिकाने या घटनेत एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने घरातून उचलून नेऊन आपल्या मित्रासमवेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिसांनी या सैनिकाला ताब्यात घेतले असून त्याचा मित्र फरार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हरदोई जिल्ह्यातील कलौली गावात घडली. या गावात राहणारी दलित समाजातील एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी गावातीलच रामचंद्र आणि तोताराम यांनी तिला एकटीला पाहून बळजबरीने उचलून घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ज्यावेळी ही मुलगी घरात तिच्या नातेवाईकांना दिसली नाही. त्यावेळी त्यांनी शोध घ्यायाला चालु केला. आजुबाजूला पाहत असताना तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याठिकाणी ते पोहचले त्यावेळी या दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींने पळ काढला. यातील रामचंद्र हा सैन्यात कामाला असून भुसावळ येथे तैनात आहे. तो सुट्टीसाठी गावाला आला होता. सुरुवातील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली परंतु नंतर त्यांनीअ गुन्हा दाखल करुन रामचंद्रला अटक केली. तर त्याचा दुसरा साथीदार फरार आहे.

The post देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *