March 12, 2017

दिल्लीतील १४४ फूट लांब वडापावची लिम्का बुकात नोंद

Written by

vadapav

vadapav
नवी दिल्ली : आज जागतिक वडापाव दिनाचा उत्साह राजधानी दिल्लीत पाहायला मिळत आहे. दिल्लीकरांनाही मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या वडापावची भुरळ पडली असून येथे तब्बल १४४ फूट लांब वडापाव तयार करण्यात आला आहे.

जगातला सर्वात मोठा हा वडापाव आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या वडापावची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीतल्या स्ट्रीट फूड चेनने हा कार्यक्रम आयोजित केला होता. धीरज गुप्ता या व्यक्तीने २३ ऑगस्ट २००१ ला जम्बो वडापावचा बिझनेस सुरू केला. त्यानंतर त्यांच्या ९ शहरातल्या आऊटलेटनी हा वर्ल्ड वडापाव डे सुरू केला. आज दिल्लीत वाटिका बिझेनस पार्क या ग्रुपच्या नुक्कडवाला या स्ट्रीट फूड चेनने हा कार्यक्रम आयोजित केला.

The post दिल्लीतील १४४ फूट लांब वडापावची लिम्का बुकात नोंद appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *