March 12, 2017

दहीहंडीचा सण नियमात राहूनच साजरा करा

Written by

devendra-fadnvis

devendra-fadnvis
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी समन्वय समितीला न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाता येणार नसल्याचे म्हणत यंदा नियमात राहूनच दहीहंडीचा सण साजरा करा, असा सल्ला दिला आहे.

१८ वर्षांखालील गोविंदावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच २० फुटांपेक्षा जास्त उंचीचा थर उभारण्यासही मनाई केल्याच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी समन्वय समितीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नियमात राहूनच दहीहंडी साजरा करण्याचा सल्ला दिला. तसेच १८ ऑक्टोबरच्या सुनावणीवेळी महाधिवक्त्यांना न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची विनंती करु, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

The post दहीहंडीचा सण नियमात राहूनच साजरा करा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *