March 12, 2017

दहशतवादविरोधी लढ्यात भारताची अफगाणिस्तानला साथ

Written by

india

india
‘स्टोर प्लेस’च्या उदघाटनाला ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पंतप्रधानांची उपस्थिती
काबूल: दहशतवाद्यांचा बीमोड करून देशात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याच्या अफगाणिस्तानच्या प्रयत्नांना भारताची कायम साथ राहील; अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाण जनतेला दिली.

काबूल येथील नूतनीकृत ‘स्टोर प्लेस’च्या उद्धघाटन समारंभाला मोदी यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थिती लावली.

अफगाणिस्तान हा भारताचा इतिहासकाळापासून अत्यंत घनिष्ट मित्र असून त्या देशाला वारंवार बाह्य शक्तींद्वारे फैलावला जाणाऱ्या दहशत, हिंसा आणि अशांततेला दीर्घकाळ सामोरे जावे लागत असल्याबद्दल आपल्याला खंत वाटते; अशा भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केल्या. अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्य आणि सौहार्द प्रस्थापित करून समृद्ध देश उभारण्याच्या अफगाण जनतेच्या प्रयत्नांना १२५ कोटी भारतीयांची साथ असेल; असे मोदी यांनी सांगितले.

भारत आणि अफगाणिस्तानची मैत्री आणि विधायक कामांच्या उभारणीतील सहकार्य हे कायम वृद्धिंगत होत राहील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानमार्गे भारत, इराण मार्गिकेची उभारणी करण्यासाठी करण्यात आलेला करार हा भारत, अफगाणिस्तान संबंधातील मैलाचा दगड असून आधुनिक अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारतही कटीबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

The post दहशतवादविरोधी लढ्यात भारताची अफगाणिस्तानला साथ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *