March 12, 2017

दयाशंकर सिंह यांनी आणखी एका वादाला फोडले तोंड

Written by

dayashanakar-singh

dayashanakar-singh
अलीगढ – पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान मायावतींवर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या दयाशंकर सिंह यांनी केले असून माझ्या मागे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असे लागले आहेत की मी जसा काही दाऊद इब्राहिम असल्याचे बोलून त्यांनी पुन्हा एकदा वादाला सुरुवात केला.

एका खासगी कार्यक्रमात भाजपचे नेते असलेले दयाशंकर सिंह बोलत होते. त्यावेळी त्यांनी मायावतीच्या आग्रा येथे झालेल्या रॅलीवर जोरदार टीका केली. मायावती यांना आता गर्दी जमविण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. उमेदवारांना विकलेल्या तिकिटांचे पैसे परत घ्या आणि गर्दी जमवा, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच मागे जे काही बोललो त्यावेळी माझी जीभ घसरली होती, अशी कबुलीही दयाशंकर सिंह यांनी यावेळी दिली.

The post दयाशंकर सिंह यांनी आणखी एका वादाला फोडले तोंड appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *