March 12, 2017

तेलंगणा; बस कालव्यात कोसळून १० जणांना जलसमाधी

Written by

accident

accident
तेलंगणा – खासगी बस येथील खम्मम या भागात पुलावरुन कालव्यात पडून भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर १८ प्रवासी जखमी आहेत. हैदराबादवरुन खम्मम जिल्ह्याकडे अपघातग्रस्त बस चालली होती. त्यावेळी चालकाचा नयाकुंगेडम भागात बसवरील ताबा सुटल्याने बस थेट नागार्जुनसागरच्या कालव्यात कोसळली. बसमध्ये यावेळी ३१ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र ७ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिघांनी उपचारादरम्यान आपले प्राण सोडले. आणखी १८ प्रवासी जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

The post तेलंगणा; बस कालव्यात कोसळून १० जणांना जलसमाधी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *