March 12, 2017

डॅडींचा पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज

Written by

arun-gavli

arun-gavli
नागपूर – पुन्हा एकदा पॅरोलसाठी कुख्यात गुंड अरूण गवळी याने अर्ज केला असून आपल्याला ३० दिवसांचा पॅरोल पत्नी आशा गवळी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे मिळावा अशी मागणी त्याने अर्जात केली आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी मुंबई पोलीस, तुरूंग प्रशासन व विभागीय आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो सध्या नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. यापूर्वीही मे २०१५ मध्ये गवळी आपला मुलगा महेश याच्या लग्नाकरता १५ दिवसांच्या पॅरोलवर तुरूंगाबाहेर आला होता. त्यावेळी मुंबई पोलीसांनी शांततेचा भंग होईल म्हणून पॅरोलवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी पॅरोलचा अर्ज नाकारल्याने गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपिल केले होते. नागपूर खंडपीठाने १५ दिवसांची रजा मंजूर केली होती.

The post डॅडींचा पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *