March 12, 2017

डाळीचे दर समान ठेवणार – गिरीष बापट

Written by

bapat

bapat
कोणत्याही परिस्थितीत तूर डाळीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी शासन कटिबध्द
ठाणे : तूर डाळीचे भाव आटोक्यात ठेवण्यात येतील, अशी ग्वाही देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेल्या डाळीचे दर व शिधापत्रिकेवरील डाळीचे दर यातला फरक लवकरच काढून टाकू, असे सांगितले. नागरिकांना शिधापत्रिकेशिवाय खुल्या बाजारात ९५ रूपये प्रती किलो भावाने तूरडाळ विक्री करणाऱ्या केंद्राचा शुभारंभ आज दुपारी मंत्र्यांच्या हस्ते वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कोणत्याही परिस्थितीत डाळीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे सांगून गिरीश बापट म्हणाले की, डाळीचा भाव व्यापारी नाहीत तर राज्य शासन ठरवेल असा प्रस्ताव आम्ही संमत केला असून तो राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी राज्याने विनंती केल्यावरून केंद्राने २१ हजार क्विंटल तूरडाळ खरेदी केली आणि हिच डाळ आता ९५ रूपयाला विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये ६० रूपये सबसिडी केंद्राने दिली आहे,अशी माहितीही त्यांनी दिली.

व्यापाऱ्यांनी डाळ विक्रीत २ टक्के नफा मिळतो, असे सांगितले आहे, मी म्हणतो त्यांनी ३ टक्के नफा घ्यावा पण शंभर रूपयांवर शंभर रुपये नफा मिळविण्याचा प्रयत्न करू नये. जे व्यापारी नफेखोर आहेत त्यांच्यावर आमची नजर राहणार आहे, असेही ते म्हणाले. आमदार मंदा म्हात्रे, नगरसेवक श्री.शेळके, शिधावाटप नियंत्रक अविनाश सुभेदार, उप नियंत्रक, शिधावाटप संगीता टकले यांची यावेळी उपस्थिती होती.

The post डाळीचे दर समान ठेवणार – गिरीष बापट appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *