March 12, 2017

डाएट म्हणजे उपासमार नव्हे

Written by

diet

diet
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांच्या बाबतीत नेहमीच काही घोटाळे होत असतात. हे लोक वजन कमी व्हावे म्हणून कमी खायला लागतात आणि त्यालाच डाएटिंग म्हणतात. खरे म्हणजे वजन घटवण्यासाठी कमी खाण्याची गरज नाही. तर भरपूर खाण्याची गरज आहे. आपण किती खातो यापेक्षा काय खातो याला महत्त्व आहे. डाएटिंग म्हणजे कमी खाणे नव्हे तर डाएटिंग म्हणजे वजन वाढवणारे पदार्थ टाळणे. तेव्हा पोटभर जेवले पाहिजे पण जेवणामध्ये मिठाई, भजे, वडा, भात, शेंगादाणे यांचे प्रमाण कमी असले पाहिजे. कारण या पदार्थातील साखर आणि चरबी यामुळे वजन वाढत असते.

चरबीच्या बाबतीतसुध्दा लोकांचे खूप गैरसमज आहेत. चरबी वाढल्याने वजन वाढते ही गोष्ट खरीच आहे. परंतु त्याबाबतची नेमकी माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. चरबी वाढल्याने वजन वाढते हे तंतोतंत बरोबर नाही. वाईट चरबीमुळे वजन वाढते हे नेमकेपणाने बरोबर आहे. प्रत्यक्षात चरबी आपल्या शरीराला आवश्यकच असते. पण जी चरबी आपल्याला पचणार नाही ती वाईट असते. न पचलेली ही चरबी शरीरामध्ये तशीच राहते. कातडी आणि रक्तवाहिन्यांच्यामध्ये साचते आणि ते भाग फुगायला लागतात. तेव्हा जी चरबी आपणाला पचणार नाही ती चरबी असलेले पदार्थ खाता कामा नयेत.

वनस्पती तुपामध्ये चरबी असते. पण ती चरबी केवळ पचतच नाही असे नव्हे तर ती आपल्या शरीराच्या तापमानाला विरघळत नाही. म्हणजे डालडासारखे वनस्पती तूप आपण खातो तेव्हा ते शरीरात गोळ्याच्या शरीरात तसेच राहते. ते जाडी वाढण्यास कारणीभूत ठरते. प्रत्यक्षात चांगली चरबी म्हणजे गायीच्या तुपातली चरबी ही शरीरात पचते आणि आवश्यक असते. चरबीचे थर आपल्या कातडीला बाहेरच्या आघातापासून वाचवत असतात.

The post डाएट म्हणजे उपासमार नव्हे appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *